काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल, प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवणार नवी जबाबदारी!

काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल, प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवणार नवी जबाबदारी!

विदर्भामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसंच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 05 फेब्रुवारी : राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी काँग्रेसने (Congress) जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले (Nana patole) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. त्यापाठोपाठ आता सहा कार्यकारी अध्यक्ष सुद्धा नेमण्याची हालचाल सुरू झाली आहे.  पक्षासाठी पूर्णवेळ देणाऱ्या नेत्यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले जाणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना याची जबाबदारी दिली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत दोन कार्यकारी अध्यक्ष देण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम आणि दलित काँग्रेसचे हक्काचे मतदार आकर्षित करण्याच्या हेतूने काँग्रेस हायकमांडकडून प्रयत्न केला जात आहे. या दोन नाराज असलेल्या नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल असं म्हटलं जात आहे.

अभिनेता सोनू सूदला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे BMCला आदेश

तर पश्चिम महाराष्ट्र येथून मंत्रिपदासाठी वर्णी लागावी यासाठी इच्छुक असलेल्या पण संधी गमावलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या तरुण चेहरा म्हणून ओळख निर्माण करत आहेत. अशातच पक्ष संघटनांमध्ये संधी दिली तर काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढवण्यासाठी उपयोगी होईल, असं कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचा मत आहे.

तर उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव आमदार कुणाल पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांचे नाव मधून नाव चर्चेत आहेत.  धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटनांमध्ये ताकद दिली तर त्याचा फायदा पक्षाला होईल, असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते.

'कावळ्याच्या शापाने...' म्हणत अजित पवारांनी निलेश राणेंना फटकारले

विदर्भामध्ये  माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसंच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भामध्ये पक्ष संघटनांमध्ये ताकद वाढविण्याच्या हेतूने  त्यांना संधी देण्याचा विचार केला जात आहे. सध्या दोन्ही नेते काही प्रमाणात नाराज असल्याने पक्षामध्ये संधी मिळाली तर नाराजी कमी करण्याचा प्रयत्न दिल्लीतील काँग्रेस नेतेमंडळी करत आहे. या नेत्यांना संधी देत जातीचे समीकरण देखील खेळण्याचा विचार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.

मराठवाड्यातून येथून बसवराज पाटील यांची कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस देण्याची शक्यता असल्याचे समजत आहे. तसंच कोकणात सुद्धा एक नेमणूक करत काँग्रेस पक्ष संघटना बळकट करावी, असा विचार वरिष्ठ नेते करत आहे. या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Published by: sachin Salve
First published: February 5, 2021, 12:47 PM IST
Tags: Congress

ताज्या बातम्या