धुक्यामुळे कर्जत कसारा लोकलच्या वेळापत्रकात बदल

धुक्यामुळे कर्जत कसारा लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबईतील धुक्यामुळे त्यांना उशिर होत आहे.धुक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनना ​सिग्नल दिसणे कठीण होते

  • Share this:

मुंबई,15 डिसेंबर: सध्या धुक्यामुळे पहाटेच्या सुमारास कर्जत-कसाऱ्याहून निघालेल्या लोकलच्या सेवेवर परिणाम होत आहे.त्यामुळे कर्जत कसारा लोकलचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या लोकल आता 10-15 मिनिटं लवकर सोडल्या जाणार आहेत

काही दिवसांआड मध्य रेल्वेच्या लोकल लेट होत आहेत. मुंबईतील धुक्यामुळे त्यांना उशिर होत आहे.धुक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनना ​सिग्नल दिसणे कठीण होते. परिणामी लोकलसेवेवर परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेने कसारा आणि कर्जत-सीएसएमटी लोकलच्या वेळेत बदल केला आहे. ही समस्या आणखी काही दिवस राहणार आहे. अशी शक्यता गृहीत धरून मध्य रेल्वेने १८ डिसेंबरपासून या गाड्या १० ते १५ मिनिटे अगोदर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल नेहमीच्या वेळात सुटणार आहेत.

लोकलचे बदलेले वेळापत्रक

कर्जत ते सीएसमटी

कर्जत ते सीएसएमटी मध्यरात्री २.२५ वा.

कर्जत ते सीएसएमटी पहाटे ३.३१ वा.

अंबरनाथ ते सीएसएमटी पहाटे ५.१२ वा.

कर्जत ते सीएसएमटी पहाटे ४.२७ वा.

कर्जत ते सीएसएमटी पहाटे ४.३९ वा.

खोपोली ते सीएसएमटी पहाटे. ४.४० वा.

कर्जत ते सीएसएमटी पहाटे ५.४५ वा.

कसारा ते सीएसएमटी

कसारा ते सीएसएमटी पहाटे ४.१० वा.

कसारा ते सीएसएमटी पहाटे ४.४५ वा.

कसारा ते सीएसएमटी पहाटे. ५.५५ वा.

कसारा ते सीएसएमटी सकाळी ६.३५ वा.

First published: December 15, 2017, 9:30 AM IST

ताज्या बातम्या