S M L

मुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस

आपल्या हुशारीने ट्रेन वेळेवर थांबवून मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी हजारो प्रवाशांचे जीव वाचवले. त्याबद्दल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सावंत यांना 5 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 3, 2018 05:35 PM IST

मुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस

मुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पण या दरम्यान आपल्या हुशारीने ट्रेन वेळेवर थांबवून मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी हजारो प्रवाशांचे जीव वाचवले. त्याबद्दल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सावंत यांना 5 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलंय.

सकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही. न्यूज 18शी त्यांनी बातचीत केली आणि अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला.

हेही वाचा

मुंबईकरांचा संताप! आधी लोकल नीट करा मग बुलेट ट्रेनचं बघा

बुराडी प्रकरण : 11 पाईप, 11 दरवाजे 11 खिडक्या आणि 11 मृतदेह, काय आहे कनेक्शन ?

बुराडी प्रकरणात नवा खुलासा, भाटिया कुटुंब रोज करायचं 'हे' काम

न्यूज 18लाशी बोलताना चंद्रशेखर सांवत म्हणाले की, 'मी पाहिलं, माझ्यासमोर पुलाचा एक भाग खाली कोसळत होता. केवळ 5 ते 7 सेकंदातच ट्रेन त्या ढिगाऱ्याखाली पोहचत होती. त्यामुळे सगळ्यात आधी मी अर्जंट ब्रेक लावला. या सगळ्याबद्दल माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. सकाळी वेळ म्हणजे प्रवाशांची कामावर जायची वेळ होती. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण मी अर्जंट ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला.'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close