S M L

सेनेची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील आज 'मातोश्री'वर जाणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 14, 2017 09:16 AM IST

सेनेची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील आज 'मातोश्री'वर जाणार

13 जून : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शिवसेनेचे गैरसमज दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वर जाणार आहे.

या ना त्या विषयांवर शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरूच असते. शेतकरी संपातही सेनेचा विरोध दिसून आला. त्यामुळे दररोज सेनेकडून होणारी टीका बरोबर नाही, आज भेटून त्यांच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी मातोश्रीवर जाण्याची तयारी दर्शवलीये.

शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयीचे अभियान हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी माझ्याकडून या विषयावर त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करेन असंही पाटील म्हणाले.तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'मातोश्री'वर जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा करू शकतात, अशी शक्यता नाकारता येणार नाही असंही पाटील म्हणाले.

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 08:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close