भाजपकडून पहिली प्रतिक्रिया : आमची दारं 24 तास उघडी, पण सेनेचा अद्याप प्रस्ताव नाही

भाजपकडून पहिली प्रतिक्रिया : आमची दारं 24 तास उघडी, पण सेनेचा अद्याप प्रस्ताव नाही

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय. संसदीय मंडळानेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 5 नोव्हेंबर : भाजपच्या कोअर कमेटीची बैठक झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिलीय. राज्यात भाजप शिवसेना महायुतीचच सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही असंही पाटील म्हणाले. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय. संसदीय मंडळानेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीतून परत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमेटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह काही नेते उपस्थित होते. तर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सरकार स्थापन करण्यासाठी थोडा वेळ लागतोच. लवकरच गोड बातमी मिळेल असंही सांगितलं.

राष्ट्रवादी-शिवसेनेची जवळीक, भाजपच्या गोटात चिंता

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या योजनेवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती 'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. पवारांनी सोनियांना सत्ता स्थापनेसाठी काय पर्याय असू शकतात आणि त्यासाठी कसं पुढे जायचं याची माहिती सोनियांना दिलीय. यावर सोनिया गांधींनी विचार करून पुन्हा भेटू असं पवारांना सांगितल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगिलंय. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव देऊ शकतात. शरद पवारांना असं वाटतं की भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देणार नाही आणि शिवसेना ते सोडायला तयार होणार नाही. उपमुख्यमंत्रिपद शिवसेना स्वीकारण्यास राजी होणार नाही. त्यामुळे सेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यास शिवसेना तयार होईल अशी शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही पण...

असं करायचं असेल तर आधी शिवसेनेने NDA सोबतचे संबंध तोडावे असं सोनिया गांधींना वाटतंय. काँग्रेसला देशव्यापी राजकारण करायचं असल्याने शिवसेनेने कुठल्या मुद्यावर जहाल भूमिका घेऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असंही सोनियांनी सूचविल्याची माहिती आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल मात्र सरकारमध्ये सामील होणार नाही असंही काँग्रेसने पवारंना सांगितल्याची माहिती 'News18इंडियाला'मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 05:03 PM IST

ताज्या बातम्या