S M L

'युती'बाबत नवा टि्वस्ट, चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं वक्तव्य

काही पक्षांची 5 वर्षांनंतर बैठका होतात. शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात.

News18 Lokmat | Updated On: Jan 24, 2019 06:05 PM IST

'युती'बाबत नवा टि्वस्ट, चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं वक्तव्य

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 24 जानेवारी :  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसंच 'युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल', असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की वेगवेगळ्या होणार यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.  मात्र चंद्रकांत पाटलांनीच निवडणुका वेगळा होणार असल्याचं जाहीर करत संभ्रम दूर केला आहे.


या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या होणार आहे, एकत्र होणार नाहीत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही  दिवशी अचानक युतीची घोषणा होईल.'

'काही पक्षांची 5 वर्षांनंतर बैठका होतात. शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात. युती इतकी भक्कम आहे की, सौम्य काय तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार आहे. काही तडे गेले असतील तरी ते भरुन निघतील.' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या पाहिजेत अशी शिवसेनेची इच्छा होती, तर वेगवेगळ्या निवडणुकांसाठी भाजपचे नेते आग्रही होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळं वेगळा निवडणुका घेण्याच्या निर्णयाचे युतीवर काही परिणाम होतील का नाही याकडे राजकीय पंडितांचं लक्ष असणार आहे.

Loading...

तर दुसरीकडे युती होणारच असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. तर युतीची चर्चा नेमकी कुठे सुरू आहे आणि ती सुरू असेल तर त्या चर्चेत शिवसेना कुठे आहे असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 06:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close