Home /News /mumbai /

संभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले...

संभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले...

'मुळात संजय राऊत यांचा कुणीतरी हिंदी आणि इंग्रजीचा वर्ग घेतला पाहिजे. One fine morning म्हणजे पहाटे नाही तर...'

    मुंबई, 30 सप्टेंबर : मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलनाचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांना सल्ला दिला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणाचा प्रकरणावर पत्रकारांनी  विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. यूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले? राऊतांनी फटकारलं 'शरद पवार यांना अज्ञान आहे असं म्हणता येणार नाही. पण ते त्यांचा विषय दुसरीकडे ढकलत आहे. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला आहे. तसंच,' शरद पवारांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये, मराठा आरक्षणावर कोर्टात सरकारने योग्य बाजू मांडली पाहिजे, मराठा आरक्षण आंदोलन सरकारला हाताळत येत नाही. म्हणून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही पाटील म्हणाले. शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना, 'संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले हे भाजपकडूनच राज्यसभेत खासदार आहे. त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय हा पंतप्रधान मोदी यांच्याकडे न्यावा', असा सल्ला दिला होता. देशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का? - ओवेसी त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपला मोर्चा संजय राऊत यांच्याकडे वळवला. आज सामना दैनिकाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे. 'मुळात संजय राऊत यांचा कुणीतरी हिंदी आणि इंग्रजीचा वर्ग घेतला पाहिजे. One fine morning म्हणजे पहाटे नाही तर एखाद्या दिवशी असा त्याचा अर्थ होतो, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राऊतांना टोला लगावला. काय लिहिले होते सामनाच्या अग्रलेखात? 'भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे व आज महाराष्ट्राचे भाजप सर्वेसर्वा म्हणून फडणवीस यांच्याकडेच पाहिले जाते. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे ‘फाइन’ प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱ्या मनाचे लक्षण आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे' असं टोला सेनेनं लगावला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Chandrakant patil, Maratha reservation, Sharad pawar, Udayanraje bhosle, उदयनराजे, मराठा आरक्षण, संभाजीराजे

    पुढील बातम्या