भाजपचं राज्याचं नेतृत्व पुन्हा चंद्रकांत पाटलांकडे, तर मुंबईची कमान अमराठी नेत्याकडे

भाजपचं राज्याचं नेतृत्व पुन्हा चंद्रकांत पाटलांकडे, तर मुंबईची कमान अमराठी नेत्याकडे

राज्यात पक्ष सत्तेबाहेर असताना चंद्रकांत पाटील यांच्या समोर मोठं आव्हान असून पक्षातल्या नाराज नेत्यांचं मन वळवत महाविकासघाडीला टक्कर द्यावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई 13 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेल्या भाजपच्या निवडणुकानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून त्यांनाकडेच भाजपचं राज्यातलं नेतृत्व राहणार आहे. तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची फेरनियुक्ती करण्यात आलीय. या ठाकिणी मराठी नेत्याची नियुक्ती केली जावी अशीही मागणी करण्यात येत होती. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह यांनी याबाबतचं नियुक्ती पत्र दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांची ही दुसरी टर्म आहे. राज्यात पक्ष सत्तेबाहेर असताना चंद्रकांत पाटील यांच्या समोर मोठं आव्हान असून पक्षातल्या नाराज नेत्यांचं मन वळवत महाविकासघाडीला टक्कर द्यावी लागणार आहे.

First published: February 13, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या