... आणि 'चंद्रकांत पाटील' आणि 'दीपक सांवतांनाही' मिळाली कर्जमाफी

... आणि 'चंद्रकांत पाटील' आणि 'दीपक सांवतांनाही' मिळाली कर्जमाफी

ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. त्या शेतकऱ्यांमध्ये दोन नाव लक्षवेधी होती. एक नाव होतं चंद्रकांत पाटलांचं आणि दुसरं नाव होतं दीपक सावंत यांचं. सूत्रसंचालकांनी जेव्हा एकामागोमाग ही नावं पुकारली तेव्हा या नावातली गंमत सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लक्षात आली.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर: आज ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीय त्यात चंद्रकांत पाटील आणि दीपक सावंतांनाही कर्जमाफी मिळाली आहे. हे ऐकून अनेकांना नवल वाटलं. पण हे दोघं मंत्री नसून त्याचं नावाचे शेतकरी आहेत.

नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलंय. पण नावात खूप काही आहे बरं का. आज शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. त्या शेतकऱ्यांमध्ये दोन नाव लक्षवेधी होती. एक नाव होतं चंद्रकांत पाटलांचं आणि दुसरं नाव होतं दीपक सावंत यांचं. सूत्रसंचालकांनी जेव्हा एकामागोमाग ही नावं पुकारली तेव्हा या नावातली गंमत सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लक्षात आली. तेव्हा मग चंद्रकांतदादांनी शेतकरी असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर हात ठेवला त्याची दोन शब्दात विचारपूसही केली. तसंच दीपक सावंत यांच्या नावाबाबतही झालं. कर्जमाफीच्या सोहळ्यात सगळंच आनंदी वातावरण होतं. या वातावरणात या नामसाधर्म्यानं आणखी रंगत आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 08:21 PM IST

ताज्या बातम्या