84 कोटी डिपॉझिट केल्याप्रकरणी अटक केलेला चंद्रकांत पटेल वायकरांचा पार्टनर,निरुपम यांचा आरोप

84 कोटी डिपॉझिट केल्याप्रकरणी  अटक केलेला चंद्रकांत पटेल वायकरांचा पार्टनर,निरुपम यांचा आरोप

नोटाबंदीच्या काळात तब्बल 84 कोटी रूपये डिपोझिट करणाऱ्या चंद्रकांत पटेल या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहेत.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 24 सप्टेंबर:नोटाबंदीच्या काळात 84 कोटींचे व्यवहार केल्याच्या आरोपाखाली पुष्पक ज्वेलर्सच्या चंदू पटेलला ईडीनं अटक केलीये. चंदू पटेल याचा राजकीय नेत्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप झालाय.

नोटाबंदीच्या काळात 84 कोटींचा व्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं मुंबईतला एक बडा मासा पकडलाय. चंदू पटेल असं या ज्वेलर्सचं नाव आहे. नोटाबंदीच्या काळात 258 किलो सोनं खरेदी करण्यासाठी चंदू पटेलनं हा पैसा वापरल्याचं सांगण्यात येतंय. ईडीनं चंदूला अटक केली असून पोलीस त्याला 27 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीये.

चंदू पटेलला अटक झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आलीये. चंदू पटेल आणि शिवसेना नेते आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप झालाय. वायकरांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.

चंदू पटेलची सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...