वेणूगोपाल धुत यांच्या कार्यालयावर CBIचे छापे

वेणूगोपाल धुत यांच्या कार्यालयावर CBIचे छापे

आयसीआयसी आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या पथकाच्या 4 पथकांनी औरंगाबाद आणि मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी: आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या 4 पथकांनी औरंगाबाद आणि मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने व्हिडिओकॉनच्या मुंबई मुख्यालयात देखील छापे टाकले आहेत.

आयसीआयसी आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या पथकाने मोठी कारवाई सुरु केली. सीबीआयने वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन ग्रुप आणि दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दीपक आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत. कर्ज वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

बँकेने व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या बदल्यात त्यांनी दीपक कोचर यांना मदत करावी असा आरोप करण्यात आला होता. कोचर आयसीआयसीच्या प्रमुख असताना व्हिडिओकॉनला 3 हजार 205 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.

- सीबीआय पथकाच्या 4 पथकांची औरंगाबाद आणी मुंबईत तपासणी सुरू

Loading...

- व्हीडिओकॉन च्या मुंबई मुख्यालयात पथक दाखल

- बँकेच्या स्टेटमेंटवर आधारित तपासणी

- बँक खात्यात अनेक संशयास्पद रकमेच्या नोंदी

- काही ट्रानझक्शन संशयास्पद

- आयसीआयसीआय बँकेचं व्हीडिओकॉन कंपनीला दिलेलं वादग्रस्त कर्ज प्रकरण

- दीपक कोचर यांच्या मध्यस्थीनं कर्ज दिल्याचा आरोप

- या कर्जासाठी अवास्तव कागदपत्रे बनविल्याचा ठपका

- दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती

- कोचर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा निष्कर्ष

- व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात दीपक कोचर लाभार्थी असल्याचा सीबीआयचा अहवाल

- वेणूगोपाल धुत यांची कंपनीने 3250 कोटींचं कर्ज घेण्यासाठी अनेक कागदपत्रे बोगस बनविल्याचा संशय

- या व्यवहार संबंधी कागदोपत्री, कॉम्प्युटर हार्डडिस्क पथकानं ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती


Special Report : 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगनंतर युतीचा 'पिक्चर' बदलणार?बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...