कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कर्जत-कसाऱ्याहून सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटं उशिरा

  • Share this:

28 एप्रिल : कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-कसाऱ्याहून सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे.

मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शुक्रवारी रुळाला तडा गेल्यानं जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्याचा नेहमीचा उपाय मध्य रेल्वेनं केला आहे, पण त्यामुळे वेळापत्रकाचा पार बोजवारा उडाला आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरु आहे.

ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

 

 

First published: April 28, 2017, 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading