मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

कल्याण, डोंबिवली,ठाणे, मुलुंड स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली आहे

  • Share this:

19 नोव्हेंबर :  ऐन सकाळी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना याचा फटका बसला असून आजचा सोमवार उशिराने सुरू झाला आहे.

कुर्ला ते मुलुंड दरम्यान तांत्रिक बिघड झाल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतुकीचे वेळापत्रक कोलडमले आहे. मुंबईकडे येणाऱ्या सर्व लोकल ३० मिनिटे उशिराने सुरू आहे. कुर्ला ते मुलुंड दरम्यानच्या वाहतुकीला फटका बसला आहे.

कल्याण, डोंबिवली,ठाणे, मुलुंड स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळी आधीच गर्दीचा वेळ असतो अशातच लोकलचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे चाकरमान्यांना आज सोमवारी लेटमार्क लागणार आहे.

विशेष म्हणजे, रविवारीच मध्य रेल्वे मार्गावर विशेष जम्बोब्लाॅक घेण्यात आला होता. कल्याण स्टेशनजवळील पत्री पूल हटवण्यात आला. मेगाब्लाॅकनंतर दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेनं आपले पाढे पंचावन्न सुरूच ठेवल्यामुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे.

========================================

First published: November 19, 2018, 8:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading