दादर स्टेशनवर ओव्हरहेड वायरचा बिघाड दुरूस्त, वाहतूक पूर्वपदावर

दादर स्टेशनवर ओव्हरहेड वायरचा बिघाड दुरूस्त, वाहतूक पूर्वपदावर

दादर स्टेशनवर ओव्हरहेड वायरमध्ये झालेला बिघाड दूर झाला असून लोकल वाहतूक हळूहळू पुर्वपदावर आलीये

  • Share this:

20 जुलै : दादर स्टेशनवर ओव्हरहेड वायरमध्ये झालेला बिघाड दूर झाला असून लोकल वाहतूक हळूहळू पुर्वपदावर आलीये. पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक ऐनसंध्याकाळी थांबली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूरला जाणारी धीमी लोकल दादर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे थांबली होती. रात्री ८.१५ मिनिटांनी एक नंबर फ्लॅटफाॅर्मवर बदलापूर लोकल येत असतानाच  नारळाची झावळी अोव्हरहेड वायरवर पडल्यामुळए पेन्टाॅग्राफमध्ये स्पार्क झाल्यामुळे बिघाड झाला. त्यामुळे मागून येणाऱ्या सर्व लोकल एका मागोमाग अडकून राहील्या. रात्रीची वेळ असल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी घरी जाण्यासाठी लोकलमध्ये अडकले होते. मध्य रेल्वेनं युद्धपातळीवर कार्यहाती घेऊन दुरूस्ती केली. अखेर तासाभराच्या दुरस्तीनंतर लोकल वाहतूक पूर्वपदावर आलीये.

First published: July 20, 2017, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading