मुंबई, 17 जानेवारी: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला आहे. कुर्ला ते माटुंगा दरम्यान सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा सध्या विस्कळीत झाली असून धीम्या मार्गावर हळूहळू वाहतूक सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाल्यानं मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.