मुंबई, 19 डिसेंबर: आज मध्य रेल्वेवरील ठाणे- दिवा दोन मार्गिकांच्या कामासाठी (Thane-Diva) मेगाब्लॉक (Mumbai Railway Megablock) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 18 तासांचा आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.
धीमी ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण आणि दिवा आणिर मुलुंड रेल्वे स्टेशनवरील फास्ट लाइन वर डायवर्ट करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंब्रा आणि कलवा येथे ट्रेन थांबणार नाही. रेल्वे प्रशासनने प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
12109/12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
12071/12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
12123/12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस
11139 मुंबई-गडग एक्सप्रेस
17612 मुंबई-नांदेड़ एक्सप्रेस
11029 मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस
सोमवार 20 डिसेंबरला रद्द करण्यात आलेल्या ट्रेन
11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
11140 गडग-मुंबई एक्सप्रेस
17317 हुबली-दादर एक्सप्रेस जेसीओ 18.12.2021 को पुण्यात शॉर्ट टर्मिनेट केले जाणार
17318 दादर-हुबली एक्सप्रेस जेसीओ 19.12.2021 पुण्याहून निघेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai local