मध्ये रेल्वेवरही आता गारेगार प्रवास, या मार्गावर धावणार AC लोकल

मध्ये रेल्वेवरही आता गारेगार प्रवास, या मार्गावर धावणार AC लोकल

सध्या ट्रायल होत असलेली AC लोकल कल्याण ते सीएसएमटी या मार्गावर धावेल की ठाणे वाशी मार्गावर धावेल याबाबत साशंकता होती. पण आता निर्णय झालाय.

  • Share this:

मुंबई 09 जानेवारी : मुंबईतल्या लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना त्रासदायक ठरलाय. हा प्रवास थोडासा सुखद व्हावा यासाठी आता AC लोकल्स सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर अशा लोकल्स आधीच सुरू झाल्या आहेत. प्रतिक्षा होती ती मध्य रेल्वेची. आता येणारा उन्हाळा मध्ये रेल्वेवरच्या प्रवाशांसाठी सुखद ठरणार असून मध्य रेल्वेवरची AC लोकल लवकरच सुरू होणार आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली AC लोकल ही ट्रान्स हार्बरवरच धावणार यावर शिक्कामोर्तब झालंय. म्हणजेच ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल या मार्गावर मध्य रेल्वेची गाडी धावेल. ट्रेन कधी धावेल यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी येणं अपेक्षित आहे.

सध्या ट्रायल होत असलेली AC लोकल कल्याण ते सीएसएमटी या मार्गावर धावेल की ठाणे वाशी मार्गावर धावेल याबाबत साशंकता होती. पण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी यावर आज शिक्कामोर्तब केलंय.

सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद राहणार, हे आहे कारण

AC लोकल असाव्यात अशी मागणी मुंबईत गेली कित्येक वर्ष होत होती. त्यानंतर पाठपुराव्याला यश आलं आणि पश्चिम रेल्वेवर पहिले AC लोकल सुरू झाली. आता मध्य रेल्वेवरही AC लोकल सुरू होणार आहे.  काही तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेवरही AC लोकल रखडली होती.

या खेकड्याच्या नांग्या ठेचा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

तर मध्य रेल्वेला कायम दुय्यम वागणूक दिली जाते असा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. पश्चिम रेल्वेवर कायम सगळ्याच  गोष्टी पहिल्यांदा आणल्या जातात असाही आरोप कायम केला जातो. त्यामुळे आता मध्य रेल्वेवरही AC लोकल आणण्यासाठी रेल्वेवरचा दबाव वाढत होता.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: January 9, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading