रोजच म.रे. ! डोंबिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, लोकल सेवा खोळंबली

रोजच म.रे. ! डोंबिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, लोकल सेवा खोळंबली

ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं सुरू आहे.

  • Share this:

डोंबिवली, 5 जून : ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं सुरू आहे. कार्यालय गाठण्याची घाई असलेल्या प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. मध्य रेल्वेच्या स्टेशनवर यामुळे गर्दी झाली आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. दरम्यान, दरदिवशीच मध्य रेल्वेवर कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे खोळंबा होत असल्यानं प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

(पाहा :SPECIAL REPORT: पावसाळ्यात मुंबईतील कोणते पूल बंद होणार?)

28 मे :सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

28  मे रोजी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.  यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक तब्बल 45 मिनिटं उशिरानं सुरू होती. वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर  प्रचंड गर्दी झाली होती.

(पाहा :SPECIAL REPORT : नवरा-बायकोचं भांडणाला हिंसक वळण, दोन गावांनी फोडली एकमेकांची डोकी!)

26 मे : कुर्ला-विद्याविहारदरम्यान रूळावरून घसरलं लोकलचं चाक 

यापूर्वी रविवारीदेखील (26 मे) मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचं चाक घसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल विद्याविहार-कुर्ला स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. यामुळे खोळंबा झाला होता. यादरम्यान, लोकल रुळावरून घसरण्यापूर्वीच महिलांच्या डब्यात शॉर्ट सर्किट होऊन धूरदेखील येऊ लागला होता. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

या गोंधळामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं.

SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 07:15 AM IST

ताज्या बातम्या