मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मध्य रेल्वेची अशीही कामगिरी, लोकलने फुकट प्रवास करणाऱ्यांकडून 71 कोटींची वसुली!

मध्य रेल्वेची अशीही कामगिरी, लोकलने फुकट प्रवास करणाऱ्यांकडून 71 कोटींची वसुली!

एप्रिल ते सप्टेंबर -२०२१ पर्यंत मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली

एप्रिल ते सप्टेंबर -२०२१ पर्यंत मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली

एप्रिल ते सप्टेंबर -२०२१ पर्यंत मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 20 ऑक्टोबर : कोरोना (corona) महामारीमुळे लोकलचे दार सर्वसामान्यांना बंद होते. पण, लशीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मध्य रेल्वेनं (Central Railway) लोकलने (mumbai local) फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 71.25 कोटींचा दंड वसूल केला आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवा सुरू आहे. पण अजूनही सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलचे तिकीट मिळणे कठीण झाले आहे. ज्या व्यक्तीने लशीचे दोन डोस घेतले आहे किंवा जे अत्यावश्यक सेवा म्हणून कार्यरत आहे, अशा व्यक्तींना लोकलचा प्रवास करता येत आहे. त्यामुळे सर्व सामन्यांना लोकलचा प्रवास करू द्यावा अशी मागणी होत आहे.  तर दुसरीकडे मध्य रेल्वेनं एका माहिती प्रसिद्ध केली आहे.

क्रूर! चांदीचे कडे आणि पैंजण चोरण्यासाठी तोडले पाय, गळा कापून केला खून

एप्रिल ते सप्टेंबर -२०२१ पर्यंत मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली. यात फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल ७१.२५ कोटी रुपयांचे वसुली करण्यात आली आहे.  १२.४७ लाख प्रकरणांमधूनही वसुली करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेत कोविड-१९ च्या संबधित योग्य वर्तनाचे पालन न केल्याबद्दल २५,६१० व्यक्तींना  शोधून दंड करण्यात आला. मध्य रेल्वेने, सरकारच्या निर्देशांनुसार कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन करताना आणि प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवण्यासाठी, चुकीने वागणाऱ्या प्रवाशाला दंड देण्यास अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम करीत आहे.

तसंच १.४.२०२१ ते ३०.९.२०२१ या कालावधीत उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवाशांची एकूण १२.४७ लाख प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून ७१.२५ कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. सर्व झोनल रेल्वेमध्ये दंडाच्या बाबतीत हे सर्वाधिक आहे.

या देशात पुन्हा सुरू झाला Coronaचा हाहाकार; दररोज 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू

तर १७.४.२०२१ ते ३०.९.२०२१ या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोविड-१९ योग्य वर्तनाचे पालन न केल्याच्या एकूण २५,६१० प्रकरणांचा शोध घेऊन दंड केला. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांची एकूण २०,५७० प्रकरणे आणि कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवासाला परवानगी नसतानाही प्रवास करणारी ५,०४० प्रकरणे आढळून आली आणि अनुक्रमे  ३४.७४ लाख आणि २५.२० लाख  दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने बोनफाईड रेल्वे वापरकर्त्यांना चांगल्या सेवा पुरवण्याच्या आणि विनातिकीट  प्रवासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात नियमितपणे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरोधात तीव्र मोहिमा राबवल्या आहेत.  उपनगरी आणि गैर-उपनगरीय / मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सखोल आणि नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते जेणेकरून सरकारी  मार्गदर्शनांनुसार आणि कोविड १९ प्रोटोकॉलचे पालन करून केवळ बोनाफाईड प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करतील.

गैरसोय टाळण्यासाठी व सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड 19 साठी अनिवार्य असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे, प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

First published: