महिला सारथी देणार CR च्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव

महिला सारथी देणार CR च्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव

मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचे आज उद्घाटन होणार आहे

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी :कालपासून मुंबईत थंडीचा कडाका वाढला आहे. जानेवारी महिला संपला तरी अद्यापही मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे ऐरवी घामाळलेले मुंबईकर जॅकेट, स्वैटर घालून अगदी टवटवीत दिसत आहे. मुंबईतील वातावरणामुळे वाहतूक सोयीची व्हावी यासाठी एसी वाहतूक व्यवस्थेची मागणी जोर धरत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल आल्यानंतर आता मध्य मार्गावरही एसी लोकल धावणार आहे. पनवेल-ठाणे मार्गावर आजपासून धावणाऱ्या या एसी लोकलचे आज उद्घाटन करण्य़ात येणार आहे. आधीच वातावरणात चांगला गारवा वाढला असून बाहेरही थंडी आतही एसी असा मजेशीर प्रवास करता येणार आहे. मनीषा मस्के ही तुमच्या एसी लोकलची सारथी असणार आहे.

मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचे आज उदघाटन होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा सीएसएमटी स्टेशनवरून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी या एसी लोकलचे उद्घाटन  करतील. ही गाडी पनवेल स्टेशन वरून सुटेल आणि विशेष म्हणजे मनीषा मस्के या महिला मोटरवूमन ही गाडी चालवणार आहेत. मध्य रेल्वे त्यातही ठाणे-वाशी -पनवेल सारख्या जास्त गर्दी नसलेल्या ट्रान्स हार्बर मार्गावर ही एसी लोकल चालवली जातेय. शुक्रवारपासून ही गाडी वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. एसी लोकलच्या एकूण 16 फेऱ्या असतील. एसी लोकलसह काही स्टेशनवरील वाय फाय, सुधारित तिकीट खिडक्या, पादचारी पूल यासारख्या सेवांचंही उदघाटन केलं जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचं उद्घाटन

-पनवेल-ठाणे मार्गावर आजपासून एसी लोकल

-सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातून पाच दिवस धावणार लोकल

-पहिली फेरी पहाटे 5.44 वा. पनवेल-ठाणे मार्गावर

-शेवटची फेरी रात्री 9.45 वा ठाणे-पनवेल मार्गावर

- एसी लोकलच्या एकूण  16 फेऱ्या

-पहिली एसी लोकल  मनीषा म्हस्के चालवणार

 

First published: January 30, 2020, 9:51 AM IST

ताज्या बातम्या