मुंबई 04 नोव्हेंबर: मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून (Mumbai Metro dispute) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कांजुरमागची जागा ही महाराष्ट्राच्या मालकीची असून त्यासाठी केंद्राच्या परवानगीची काहीही गरज नाही असंही त्यांनी केंद्र सरकारला ठणकावलं आहे. या एक वर्षात शिकण्यासारखं खूप होतं. संयम कसा बाळगावा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शिकलो असंही ते म्हणाले. मुंबईच्या भल्यासाठी कारशेडचं स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असंही त्यांनी सांगितली. ‘ABP माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, कारशेडच्या जागेवरुन विरोधकांकडून राजकारण केलं जातं आहे. कारशेड कांजूरमार्गला नेल्यानं मुंबईकरांचा फायदा होणार आहे. आरे कारशेडमुळे मिठी नदीच्या प्रवाहाला धोका होता अशी माहितीही त्यांनी दिली.
आदित्य पुढे म्हणाले, माझं काम हेच विरोधकांना उत्तर आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात फार वेळ खर्च करत नाही. आम्ही राजकारण लोकांची सेवा म्हणून बघतो. सध्या कामच एवढं असतं की त्या व्यापात कुणाचीही चिड येत नाही असंही ते म्हणाले. महाराष्ट्रासाठी आम्ही सुख-समृध्दीचे दिवस आणू. लोकांचा विश्वास महाविकासआघाडी सरकारवर आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
चीन आणि पाकिस्तानला सुटेल थरकाप, शत्रूंचा कर्दनकाळ असलेले आणखी 3 राफेल भारतात
मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी मंगळवारीच स्पष्ट केलं होतं. संबंधित जमीन महसूल विभागाची असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पूर्ण केल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली होती.
मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले होते.
राज्यात COVID रुग्णांच्या संख्येत सलग 20 दिवसांपासून घट कायम, 125 जणांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray