केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, सरनाईकांवरील कारवाईवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

'दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आज हे बघायला मिळाले आहे'

'दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आज हे बघायला मिळाले आहे'

  • Share this:
    मुंबई, 24 नोव्हेंबर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena Mla Pratap Sarnik) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही 'दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे, आज बघायला मिळेल.' असं म्हणत सरनाईक यांच्यावरील कारवाईचा निषेध  केला आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर पत्रकार परिषद शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'दिल्लीत वेगळं राज्य असेल तर राज्य चालवणं कठीण असतं. लोकांची कामं करत असताना मदत करण्याऐवजी‌ केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज‌ पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आज हे बघायला मिळेल' असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'आज जे आघाडी सरकार चालू आहे, त्याला सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नैराश्यपणा भाजप नेत्यांमध्ये आला आहे, त्याचे हे प्रतिक आहे.  आपल्याला सत्ता मिळणार नाही. याचा आक्राळपणा अशा प्रकरणातून दिसून येत आहे', असा टोलाही पवार यांनी भाजपला लगावला. 'दानवे यांना अनेक वर्ष विधिमंडळात काम करताना पाहिले आहे.  पण त्यांचा हा गूण माहित नव्हता. उद्याच चित्र सांगण्याचे जोतिष्य शास्त्र जाणकार ते आहेत हे मला माहिती नव्हते.  ज्योतिष्य जाणकार म्हणून त्यांची ओळख आज झाली आहे', असा टोलाही पवार यांनी दानवे यांना लगावला. 'सत्ता गेल्यावर त्रास होतो. हे मी समजू शकतो. त्या त्रासाच्या पोटी अशा प्रकारचे विधान ते करत आहे. त्यामुळे त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. माणसाने आशा ठेवायला पाहिजे. मागेही ते 'मी पुन्हा येईन' म्हणाले होते. पण, अशी अतिभावना त्यांच्यात असेल तर लोकं गांभीर्याने घेत नाही', असा टोला पवार यांनी फडणवीस यांना लगावला.
    Published by:sachin Salve
    First published: