मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बोलघेवडे लोकांनी लक्षात घ्यावे, केंद्राकडून राज्यात दुप्पट मदत, फडणवीसांची टोलेबाजी

बोलघेवडे लोकांनी लक्षात घ्यावे, केंद्राकडून राज्यात दुप्पट मदत, फडणवीसांची टोलेबाजी

'जे कांगावे खोर आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, लोकं दुःखात आहेत, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करत आहे'

'जे कांगावे खोर आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, लोकं दुःखात आहेत, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करत आहे'

'जे कांगावे खोर आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, लोकं दुःखात आहेत, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करत आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 26 एप्रिल :  'सतत जे बोलघेवडे लोकं केंद्र सरकारवर (Central Government) बोलतात, त्यांनी इतकंच लक्षात घ्यावे की, केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला (Maharashtra Government) दुप्पट दिले आहे' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पलटवार केला आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्र सरकारने दहा दिवसांसाठी 16 लाखांपैकी 4 लाख 35 हजार रेमडेसीवीरचे इंजेक्शन महाराष्ट्राला दिले आहेत. सर्वात मोठा कोटा महाराष्ट्रला मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रला दिलासा मिळेल. 1750 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला उपलब्ध करून दिला आहे. सतत जे बोलघेवडे लोक केंद्र सरकारावर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की. इतर राज्यापेक्षा दुप्पट दिले आहे हा ऑक्सिजनचा साठ 1100 व्हेंटिलेतर दिले आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

अंपायरला लागला थ्रो! त्यानंतर पंतनं केलेली कृती पाहून वाटेल अभिमान, VIDEO

'जे कांगावे खोर आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, लोकं दुःखात आहेत, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करत आहे. राज्य सरकार आपल्या पद्धतीने मदत करत आहे. केंद्रांची पूर्ण मदत राज्याला आहे म्हणून रोज सकाळी उठून त्यांनी कांगावा बंद करावा, असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला.

स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय; केवळ याच गोष्टीसाठी करणार सोशल मीडियाचा वापर

'पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी लसीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकासआघाडीमध्ये एकवाक्यता असली पाहिजे एक तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत स्टेटस बदलायला हवी, कारण आता मोठ्या संख्येनं लोकं यात सामील होणार आहेत आणि त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहेत, त्याचे धोरण मात्र राज्य सरकारने ठरवले पाहिजे', असा सल्ला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.

आदित्य ठाकरेंना टोला

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये स्पष्ट केले आहे की, प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे, राज्यांवर याचा भार नाही, पण हे जरूर आहे एखाद्या राज्याला वाटले की, त्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करायचे आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे. खाजगी आस्थापनांना वाटलं स्वतःचा पैसा खर्च करून लसीकरण करायचे आहे तर ते करू शकतात बाजारामध्ये उपलब्ध आहे, परंतु, शंभर टक्के भारतीयांकरिता केंद्राने ही व्यवस्था उपलब्ध केली आहे. आता मंत्र्यांकडून वेगवेगळे स्टेटमेंट का दिले जात आहेत, कोणती पॉलिसी त्यांची आहे, ते का ट्विट करत आहेत आणि ते ट्विट डिलीट का केले जात आहेत', त्याबद्दल मला बोलायचे नाही, असं म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Mumbai