मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देशभरात ऑक्सिजन अभावी रुग्ण मृत्यूच्या दारात; अपशय झाकण्यासाठी केंद्राची CBI खेळी - राष्ट्रवादी

देशभरात ऑक्सिजन अभावी रुग्ण मृत्यूच्या दारात; अपशय झाकण्यासाठी केंद्राची CBI खेळी - राष्ट्रवादी

NCP on CBI raid at Anil Deshmukh house: अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने धाडसत्र सुरू केलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आली आहे.

NCP on CBI raid at Anil Deshmukh house: अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने धाडसत्र सुरू केलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आली आहे.

NCP on CBI raid at Anil Deshmukh house: अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने धाडसत्र सुरू केलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, २४ एप्रिल: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणानंतर आता मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआय (CBI)ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल केला आहे. इतकेच नाही तर शनिवार सकाळपासून अनिल देशमुख यांच्या मुंबई (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी धाडसत्र सुरू केलं आहे. सीबीआयने केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीची (NCP) प्रतिक्रिया आली आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील विविध भागांत ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर तसेच कोविड प्रतिबंधक लस पुरवण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे आणि हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने ही सीबीआय कारवाई केल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी सीबीआय खेळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आले आहे की, "प्राणवायू पुरवण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. देशभर ऑक्सिजनअभावी रुग्ण मृत्यूच्या दारात आहेत. राजधानीत 24 तासांत 30 रुग्णांचा मृत्यू झाला. ना ऑक्सिजन ना रेमडेसिवीर, ना लस. हे अपयश झाकत माध्यमांचं लक्ष विचलित करण्याची केंद्र सरकारची ही जुनीच CBI खेळी."

वाचा: परमबीर सिंग यांची बदली ते देशमुखांविरोधात FIR! महिनाभरात याप्रकरणी घडल्या मोठ्या घडामोडी

राजकीय उद्दिष्टे साध्य करणअयासाठी धाडसत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं, अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआय चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. याबाबत 4 जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत काय निष्पन्न झाले याचा अहवाल कोर्टासमोर मांडल्याचं अद्याप ऐकलेलं नाहीये. हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरुन ही चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे.

First published:

Tags: Anil deshmukh, CBI, NCP