• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा' चंद्रकांत पाटलांचं शहांना पत्र

'अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा' चंद्रकांत पाटलांचं शहांना पत्र

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता.

  • Share this:
मुंबई, 30 जून: महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government) आमदार आणि मंत्र्याची ईडीकडून (ED) चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यत्र चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्रच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयतर्फे सखोल चौकशी कराावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा खालावली; ICU मध्ये केलं दाखल भाजपच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा चंद्रकांतदादांनी  दावा केला आहे. राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती याआधीही भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीबद्दल ठराव मांडण्यात आला होता. भाजपच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. मात्र देशमुखांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीदेखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपनं केलीय. या दोघांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा प्रस्ताव कार्यकारिणीत करण्याचं भाजपनं निश्चित केलं होतं काय मांडला होता भाजपने प्रस्ताव सातत्याने महाविकास आघाडीतील विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ज्यांनी हे प्रकरण उजेडात आणलं, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या प्रस्तावाला म्हटलंय. सचिन वाझेने गृहमंत्री अनिल देशमुखांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यामुळे या दोन मंत्र्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या प्रस्तावातून करण्यात आली होती.
Published by:sachin Salve
First published: