Home /News /mumbai /

चौकशीची पिडा टळली, उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना CBI कडून क्लिन चीट!

चौकशीची पिडा टळली, उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना CBI कडून क्लिन चीट!

आता सत्तेतून पाय उतार होताच  उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली

आता सत्तेतून पाय उतार होताच उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली

आता सत्तेतून पाय उतार होताच उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली

मुंबई, 02 जुलै : महाविकास आघाडी सरकार कोसळले असल्यामुळे ईडी सीबीआयची पिडा आता मागे लागणार नाही, अशी चर्चा रंगली असताना मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीपाठोपाठ सीबीआयने आता क्लिन चीट दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही  पुरावे नसल्याचे ईडीने स्पष्ट केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. त्यामुळे ईडी ही मातोश्रीपर्यंत पोहोचली अशी चर्चा रंगली होती.  पण, आता सत्तेतून पाय उतार होताच  उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना  आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे. CBI ने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.  मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर झाला असून यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या बाबतीत कोणतेही पुरावे आढळले नाहीत.  त्यांचा थेट सहभाग गैर व्यवहारात आढळले नाहीत, असं नमूद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? मेसर्स पुष्पक बुलियन ही पुष्पक ग्रुपची एक कंपनी आहे. पुष्पक ग्रुप हा महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. या कंपनीची 6 कोटी 45 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 फ्लॅट्सचा समावेश आहे. निलांबरी प्रोजेक्ट हा साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आहे. साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची आहे. पुष्पक ग्रुपने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीच्या माध्यमातून पैसा पाटणकरांच्या कंपनीला दिला. मेसर्स हमसफर डिलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पैसे दिले. विनातारण 30 कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि यानंतर ही कावराई करण्यात आल्याचं सांगितले जात होते.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra News

पुढील बातम्या