मुंबईच्या रस्त्यांवर बाईकवरून फिरतेय मांजर, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

मुंबईच्या रस्त्यांवर बाईकवरून फिरतेय मांजर, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या या मांजरीला तुम्ही पाहिलं का?

  • Share this:

मुंबई, 01 नोव्हेंबर: आतापर्यंत आपण कुत्रा, कोंबडा असे प्राणी बाईकवरून जाताना किंवा सायकलवरून जाताना पाहिले असतील मात्र मुंबईत मांजरीचा एक भन्नाट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईत बाईकस्वारांचे स्टंट आणि बाईकर्सना आपण हायवेवर पाहात असतो. मात्र मुंबईतील मायानगरीत एक मांजरही स्टंट करत या बाईकवरून फिरते आहे. ह्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे मांजर रातोरात फेमस झाली आहे. सेलिब्रेटींएवढेच लाखोंच्या घरात या मांजरीसाठी लाईक्स मिळाले आहेत.

वीब नावाच्या एका ट्विटर हॅडलवर 27 नोव्हेंबर रोजी दोन फोटो अपलोड करण्यात आले होते. हे फोटो काही सेकंदात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. लाल रंगाच्या बाईकवर तांबूस रंगाची ही मांजर अगदी सहज आणि अॅटीट्यूडमध्ये मागच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे. या फोटोत एक रंजक गोष्ट अशी आहे की मांजरीची उंची ही त्या बाईकच्या सीटवर परफेक्ट मॅच होत असल्यानं अगदी व्यवस्थित ही मांजर सीटवर बसू शकली आहे. त्यामुळे बाईक सुरू असतानाही ती स्वत:चा तोल अगदी व्यवस्थीत सांभाळू शकते आहे.

हे दृश्यं अगदी दुर्मीळ आणि सुंदर असल्याचं, नेटकऱ्यांनी ही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. आतापर्यंत या पोस्टला दोन हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि रिट्विट करण्यात आले आहेत. मागच्या सीटवर बसलेल्या या मांजरीचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे.

रिक्षावर कुत्राचा तुफानी स्टंट, VIDEO झाला व्हायरल

याआधी मुंबईतील सुल्तान नावाच्या कुत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा कुत्रा भर रस्त्यात रिक्षावर चढून स्टंट करत होता. त्याच्या ह्या स्टंटबाज व्हिडिओमुळे सुल्तान कुत्रा एका रात्रीमध्ये तुफान फेमस झाला होता. ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईची राणी नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पब्लिश करण्यात आला होता.

या कुत्र्याच्या व्हिडिओने फेसबुकवरही धुमाकूळ घातला होता. ट्विटरवर ह्या व्हिडिओला 144 रिट्विट, 686 लाईक्स मिळाले होते. त्यानंतर मध्यंतरी बोलणारा कोंबडा आणि बाईकच्या मीररवर बसणारा कोंबडाही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ही बाईकवरून फिरणारी मांजर व्हायरल होत आहे.

First published: December 1, 2019, 9:15 PM IST
Tags: catmumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading