मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नवाब मलिकांच्या आरोपांमुळे समीर वानखेडेंकडून प्रकरणं काढली नाही, प्रवीण दरेकरांचा दावा

नवाब मलिकांच्या आरोपांमुळे समीर वानखेडेंकडून प्रकरणं काढली नाही, प्रवीण दरेकरांचा दावा

'कर्तबगार अधिकारी ड्रग्स प्रकरणं कंट्रोल करण्याचे काम करतो. जर अशा अधिकाऱ्याची जाणीवपूर्वक बदली किंवा तपास काढून घेतला जात असेल तर ते दुर्दैवी ठरेल'

'कर्तबगार अधिकारी ड्रग्स प्रकरणं कंट्रोल करण्याचे काम करतो. जर अशा अधिकाऱ्याची जाणीवपूर्वक बदली किंवा तपास काढून घेतला जात असेल तर ते दुर्दैवी ठरेल'

'कर्तबगार अधिकारी ड्रग्स प्रकरणं कंट्रोल करण्याचे काम करतो. जर अशा अधिकाऱ्याची जाणीवपूर्वक बदली किंवा तपास काढून घेतला जात असेल तर ते दुर्दैवी ठरेल'

मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक (Aryan Khan arrest case) करणे एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडेंना (sameer wankhede) चांगलेच महागात पडले आहे. समीर वानखडेंकडून सहा प्रकरणं काढून घेण्यात आली आहे. पण, ते एक कर्तबगार अधिकारी आहे, त्यांच्यावर झालेली कारवाई ही नवाब मलिक यांच्या बिनबुडांच्या आरोपांमुळे झाली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (prveen darekar) यांनी दिली.

समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह एकूण 6 प्रकरणं काढून घेण्यात आली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावरून आपली भूमिका मांडली आहे.

'समीर वानखेडे यांच्या बदली किंवा तपास काढून घेण्याचा निर्णय हा एनसीबीच्या तपास यंत्रणेचा भाग आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे समीर वानखेडेंकडून तपास काढून घेण्यात आला असं काही नाही. तपास चुकीचा केला होता किंवा तपास सुरळीत होईल, असं मानण्याचं कारण नाही' असं दरेकर म्हणाले.

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये राकेश झुनझुनवालांनी तासाभरात कमावले 101 कोटी!

परंतु, एखादा कर्तबगार अधिकारी ड्रग्स प्रकरणं कंट्रोल करण्याचे काम करतो. जर अशा अधिकाऱ्याची जाणीवपूर्वक बदली किंवा तपास काढून घेतला जात असेल तर ते दुर्दैवी ठरेल अन्यथा ते तपास यंत्रणेचा भाग आहे. येणाऱ्या काळात सर्व काही बाहेर येईल. एनसीबीबद्दल लोकांच्या मनात सांशकता नसावी म्हणून अशी कारवाई केली असावी, असंही दरेकर म्हणाले.

नवाब मलिकांना केला कारवाईबद्दल आनंद व्यक्त

तर,  राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवाब मलिक यांनी ट्वीट करून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी केली आहे एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असं मलिक म्हणाले.

समीर वानखेडेंचा खुलासा

दरम्यान, दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपल्याला पदावरून हटवलं नाही, असा दावा केला आहे. 'माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत फक्त 6 केसेस दिल्लीतील टिमकडे देण्यात आल्यात. आर्यन खान, समीर खान यांच्या केसचा तपास त्या टीमकडून होणार आहे. आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार आहे, अशी माहितीही समीर वानखेडेंनी दिली.

T20 World Cup : तीन बॉलला तीन विकेट, तरी शमीला मिळाली नाही हॅट्रिक! VIDEO

तसंच, 'मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून  कायम आहे. आर्यन खान, समीर खान आणि इतर 4 केसेस च्या तपासासाठी एनसीबी दिल्लीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की, या दोन केसेस कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास केल्या जाव्यात' असंही वानखेडे म्हणाले.

First published:
top videos