ट्रिपल तलाक..महाराष्ट्रात पहिला गुन्हा, 7 महिन्यांची गरोदर होती तक्रारदार महिला

ट्रिपल तलाक विधेयकानंतर राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. एका मुस्लिम महिलेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून तिची सासू, सासरा आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 05:13 PM IST

ट्रिपल तलाक..महाराष्ट्रात पहिला गुन्हा, 7 महिन्यांची गरोदर होती तक्रारदार महिला

अजित मांढरे (प्रतिनिधी)

ठाणे, 2 ऑगस्ट- तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. मुंब्रा येथील एका उच्चशिक्षित महिलेने मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदाच्या अंतर्गत पतीविरोधात हा तक्रार दाखल केली आहे. महिलेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून तिची सासू, सासरा आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  14 महिन्यांपूर्वी या महिलेला पती इम्तियाज गुलाम पटेल याने व्हॉट्सअॅपवर 3 वेळा तलाक..तलाक..तलाक म्हणून तिला गेल्यावर्षी घटस्फोट दिला होता. महिलेला अशा अवस्थेत तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवर 'तलाक..तलाक..तलाक', असा मेसेज पाठवला होता. तेव्हा तक्रारारदार महिला 7 महिन्यांची गरोदर होती. मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ही माहिती दिली आहे.

तिहेरी तलाकवरुन देशात गदारोळ होत असताना हे विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात अनेक मुस्लिम महिलांनी अनेक ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेत. राज्यात ही गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. कौसा मुंब्रा येथील एका उच्चशिक्षित महिलेने मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदाच्या अंतर्गत आपल्या पती विरोधात हा गुन्हा दाखल केला असून गेल्या वर्षी या महिलेला पती इम्तियाज गुलाम पटेल यानं व्हॉट्सअॅप वर 3 वेळा तलाक तलाक तलाक म्हणून तिला गेल्यावर्षी घटस्फोट दिला होता. त्यावेळेस कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याने महिलेने गुन्हा दाखल केला नाही, मात्र आता तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर महिलेने पती विरोधात गुन्हा दाखल केलाय.

मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम 4 सोबत, कलम 498 अ, 406 , 34 या कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय गेल्या वर्षीपासून दुसऱ्या महिलेसोबत पतीने लग्न केल्याबद्दल तसेच हुंडा, मानसिक-शारिरीक छळ अशा प्रकारची तक्रार या महिलेने पतीसोबत सासू आणि नणंद यांच्या विरोधात देखील केली. पीडित महिला एमबीए आहे. ज्यावेळेस तिला तलाक दिला होता तेव्हा ती 7 महिन्यांची गरोदर होती. आता तिचा मुलगा 6 महिन्यांचा आहे.

दरम्यान, 30 जुलैला तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाले. राज्यसभेत हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर केले. आता विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू होईल.

Loading...

या विधेयकात या आहेत तरतूदी..

तिहेरी तलाक विधेयकाचे पूर्ण नाव मुस्लिम महिला (महिला अधिकार संरक्षण कायदा) विधेयक, 2019 असे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर तोंडी, लेखी आणि अन्य कोणत्याही माध्यमातून तीन वेळा तलाक देण्यावर बंदी असेल. अशा पद्धतीने तलाक दिल्यास तो गुन्हा ठरेल. अशा पद्धतीने पत्नीला तलाक दिल्यास तो गुन्हा असेल आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येऊ शकेल.

तुरुंगवास आणि होणार दंड

एखाद्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकते. त्याच बरोबर त्याला दंड देखील होऊ शकतो. अशा पद्धतीने पतीवर गुन्हा दाखल केल्यास जामीन मिळवण्यासाठी त्याला न्यायालयात जावे लागेल. पत्नीला मिळणार नुकसान भरपाई

जर एखाद्या महिलेला तिहेरी तलाक दिला तर ती महिला पतीकडून नुकसान भरपाई मागू शकते. अर्थात पत्नीला किती नुकसान भरपाई द्यावी हे निश्चित करण्यात आलेले नाही. पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.

मुलाचा ताबा कोणाला मिळणार?

तिहेरी तलाक विधेयकानुसार पीडित महिला अल्पवयीन मुलाचा ताबा स्वत:कडे मागू शकते. मुलाचा ताबा कोणाकडे द्यावा याचा निर्णय न्यायालयातील सुनावणीनंतर केला जाईल.

'SUPER 30'चा पार्ट 2: 75 दुणे...अचूक पाढे म्हणाऱ्या'सुपर आजी',एकदा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...