विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा, ऐश्वर्या रायचा अपमान केल्यामुळे NCPची मागणी

विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा, ऐश्वर्या रायचा अपमान केल्यामुळे NCPची मागणी

'एक्झिट पोलच्या नावाखाली एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय अपमान करत आहेत. महिला आयोग कुठे झोपलं आहे'

  • Share this:

मुंबई, 20 मे : महिलांचा अपमान करणार्‍या विवेक ओबेरॉय यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय हे भाजपला समर्थन देऊन महिलांबाबत मर्यादा सोडून अपशब्द बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली आहे.

'एक्झिट पोलच्या नावाखाली एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय अपमान करत आहेत. महिला आयोग कुठे झोपलं आहे' असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

विवेक ऑबेरॉय रविवारी लागलेल्या एक्झिट पोलवर एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये विवेकने दुसऱ्या एका युझरचं मीम शेअर केलं. या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत होते. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एग्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली होती.
विवेकने शेअर केलेल्या मीममधील पहिल्या फोटोत सलमान आणि ऐश्वर्या होते. या फोटोला 'ओपिनियन पोल' असं कॅप्शन दिण्यात आलं होतं. दुसऱ्या फोटोमध्ये विवेक आणि ऐश्वर्या दिसत होते. या फोटोवर 'एग्झिट पोल' असं लिहण्यात आलं होतं. तर तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत होती. या फोटोला  'रिझल्ट' असं कॅप्शन देण्यात आलं होतं.

विवेक ऑबेरॉयच्या या ट्वीटवर संताप व्यक्त करत नवाब मलिक यांनी गुन्ह्याची मागणी केली आहे. 'या सगळ्या प्रकारावर केंद्र आणि राज्य सरकार कारवाई का करत नाही. सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर जनतेमधून उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालावं' अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 04:36 PM IST

ताज्या बातम्या