Home /News /mumbai /

8 वर्षांपूर्वीचं प्रकरण, लोकल ट्रेनमध्ये महिलेला Kiss करणं व्यावसायिकाला पडलं भारी; न्यायालयानं सुनावली शिक्षा

8 वर्षांपूर्वीचं प्रकरण, लोकल ट्रेनमध्ये महिलेला Kiss करणं व्यावसायिकाला पडलं भारी; न्यायालयानं सुनावली शिक्षा

मुंबईतील एका व्यावसायिकाला (Mumbai businessman) न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

    मुंबई, 03 एप्रिल: मुंबईतील एका व्यावसायिकाला (Mumbai businessman) न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याच्यावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या 37 वर्षीय व्यक्तीनं मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai local train) एका महिलेला किस (Kiss in Train)केलं होतं. ही घटना 2015 सालची आहे. आपण हे जाणूनबुजून केले नसल्याचा युक्तिवाद दोषी व्यावसायिकाने न्यायालयात केला. उलट शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीनं त्याला ढकललं होतं. त्यानंतर तो समोर बसलेल्या महिलेवर पडला आणि त्याच्या ओठांनी त्याच्या गालाला स्पर्श झाला होता. मात्र न्यायालयानं सर्व युक्तिवाद फेटाळून लावत शिक्षा घोषित केली आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट व्हीपी केदार यांनी 37 वर्षीय किरण होनावरला दोषी ठरवलं आहे. मॅजिस्ट्रेट म्हणाले की, FIR मध्ये असे दिसून आलं आहे की ट्रेनमध्ये चढल्यानंतर आरोपी महिलेसमोर बसला आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ते म्हणाले, महिलांमध्ये गैर आणि अशाब्दिक संकेत जाणण्याची आणि समजून घेण्याची जन्मजात क्षमता असते, तसेच लहान तपशीलांकडे लक्ष असते. त्यामुळे महिलेने हे आरोप अजाणतेपणी केले आहेत, असे म्हणता येणार नाही. उजव्या गालावर घेतलं होतं किस महिला आणि तिचे मित्र साक्षीदार असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या संदर्भात दोघांनीही साक्ष दिली होती. याशिवाय आणखी दोन जणांनीही साक्ष दिली. त्यावेळी महिलेने आरडाओरड केला तेव्हा सहप्रवाशांनी आरोपीला मारहाण केल्याचं त्यांनी पाहिलं होतं. न्यायालयाने म्हटले, आरोपीनी महिलेच्या उजव्या गालाचं किस घेतलं होतं याचं प्रत्यक्ष, ठोस आणि सकारात्मक पुराव्यांवरून सिद्ध झालं आहे. शिक्षेची घोषणा न्यायालयानं व्यावसायिकाला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जर वसुली झाली तर महिलेला नुकसानभरपाई म्हणून 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात कमाल शिक्षा पाच वर्षांची असली तरी न्यायालयाने केवळ एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हेगारी इतिहासाचे कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटलं आहे. त्याच्या कुटुंबात तो एकमेव कमावता आहे. न्यायालयाने म्हटले की, आरोपीचे कृत्य त्याच्या वैयक्तिक हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर हल्ला करण्याशिवाय दुसरे काहीही नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai high court, Mumbai local

    पुढील बातम्या