मुंबई 05 जून : मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात एका नर्सनं डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. या नर्सनं डॉक्टरवर बलात्काराचा आरोप (Rape Allegations on Doctor) केला आहे. हिंदुजा हॉस्पिटलमधील या डॉक्टरनं आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार केला असल्याचं या नर्सनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. निखिल जॉन असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पुढील तपास करत आहे.
हेही वाचा - लग्न करणाऱ्यांना आता 'नो टेन्शन', राज्य सरकारकडून नियमात बदल
महिला डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, पीडित आणि डॉक्टर यांची भेट 2014 साली छत्तीसगडमध्ये झाली होती. इथूनच दोघांची ओळख झाली. या ओळखीचं पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं. यानंतर आरोपी डॉक्टरनं संबंधित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र, काही काळानंतर या नर्सनं लग्नाचा विषय काढला असता डॉक्टरनं लग्नास स्पष्टपणे नकार दिला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं पोलीस ठाणं गाठलं. तिनं पोलिसांना या प्रकरणाबाबतची संपूर्ण माहिती दिली असून पोलीस सध्या डॉक्टरचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - 'या' जिल्ह्यात सोमवारपासून अंत्यविधीसाठी कोणतीही बंधनं नाही, वाचा सविस्तर
बांद्रा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं शुक्रवारी संध्याकाळी निखिल जॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. या नर्सनं दिलेल्या डॉक्टरविरोधात आयपीसी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे. अद्याप या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Rape