'तसला' व्हिडिओ दाखवून सेल्स एक्झिक्युटिव्हने केला कस्टमरच्या पत्नीवर बलात्कार

'तसला' व्हिडिओ दाखवून सेल्स एक्झिक्युटिव्हने केला कस्टमरच्या पत्नीवर बलात्कार

मुंबईमध्ये एका कार कंपनीत काम करणाऱ्या सेल्स एक्झिक्युटिव्हने कस्टमरच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट- मुंबईमध्ये एका कार कंपनीत काम करणाऱ्या सेल्स एक्झिक्युटिव्हने कस्टमरच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्याम अभिमन्यू मस्के असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला माहिम येथून अटक केली आहे.

चुंबन घेतलं पण दुर्लक्ष केलं..

मिळालेली माहिती अशी की, आरोपी एका कार कंपनीत नोकरीला आहे. पीडितेच्या पतीने आरोपीच्या मध्यस्थीने कार खरेदी केली होती. या संदर्भात पीडितेने आरोपीची भेट घेतली होती. यावेळी आरोपीने पीडितेचे चुंबन घेतले होते. तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने पीडितेला बाहेर फिरायला बोलावले. दोघेही हॉटेलमध्ये गेले. तिथे त्याने तिच्या दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळले. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर मोबाइलच्या कॅमेऱ्यात बलात्काराचे चित्रीकरणही केले.

'तसला' व्हिडिओ दाखवून केले ब्लॅकमेल

मुंबईतील एका जॉगर्स ट्रॅकवर काही दिवसांनी तो पीडितेला पुन्हा भेटला. त्याने तिला पुन्हा शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिला 'तो' व्हिडिओ दाखवला. एवढेच नाही तर तो पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलही केले. भीतीपोटी पीडितेने आरोपीसोबत येण्यास होकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर दोन-तीनदा बलात्कार केला. त्यानंतरही आरोपी तिला ब्लॅकमेल करतच होता. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितला. तिच्या पतीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला माहिम येथील त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त केला आहे. त्यात पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 05:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading