...आणि म्हणून 6 वर्षाचा चिमुकला बनला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक!

आशिष मंडल हा अवघ्या ६ वर्षांचा चिमुकला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक झाला आहे. विश्वास बसत नाहीये ना! पण हे खरं आहे.

आशिष मंडल हा अवघ्या ६ वर्षांचा चिमुकला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक झाला आहे. विश्वास बसत नाहीये ना! पण हे खरं आहे.

  • Share this:
24 मार्च : आशिष मंडल हा अवघ्या ६ वर्षांचा चिमुकला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक झाला आहे. विश्वास बसत नाहीये ना! पण हे खरं आहे. मूळचा बिहारच्या कटीहरा इथला रहिवासी असलेल्या आशिषला एक दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी मुंबईचं टाटा हॉस्पिटल गाठलं. इथेच या मुलावर उपचार सुरू आहेत. आशिषला पोलिसात जाण्याची खूप इच्छा आहे. ही इच्छा त्याने डॉक्टरांकडे बोलून दाखवली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माय विष फाउंडेशनच्या मदतीने मुंबई पोलिसांच्या मुलुंड पोलीस ठाण्याशी सम्पर्क साधला गेला. या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मग एक दिवसाचा इन्स्पेक्टर म्हणून आशिषला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसविण्यात आलं. मुंबई पोलीस दिवस रात्र आपल्या रक्षणाससाठी तत्पर तर असतातच परंतु कधी कधी ते अशी सामाजिक भान ही जपतात की त्याचे कौतुक करावे तितके थोडे असते. मुलुंड पोलीस ठाण्यात ही एक असा उपक्रम पार पडला की ज्याने मुंबई पोलिसांचे मोठं कौतुक होत आहे. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्याने आशिषचे आईवडील देखील हरकून गेले होते. रोज आजाराने लढणाऱ्या आपल्या मुलाच्या अंगावरील खाकी वर्दी आणि चेहऱ्यावरील हसु पाहून त्यांनी ही मुलुंड पोलीस ठाण्याचे आभार मानले. नेहमीच कायदा सुव्यसथा राखण्यात मग्न असलेल्या आणि त्यासाठी प्रसंगी कठोर ही होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या हळव्या कार्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. पण गंभीर आजारातून आशिष सुखरूप बाहेर यावा आणि त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच प्रार्थना.
First published: