मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी

CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशनानंतर सीबीआयने तपास करून अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 26 मे : 100 कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून (MVA Goverment) मुंबई न्यायालयात (Mumbai Court) दाखल केली होती. अखेर या याचिकेवर 8 जूनपासून सुनावणी होणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशनानंतर सीबीआयने तपास करून अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बदल्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आणि कट रचल्याचा मुद्दा आहे, उपस्थितीत करण्यात आला आहे.

काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेचा अश्लील VIDEO कॉल; ब्लॅकमेलनंतर प्रकरण उजेडात

त्यामुळे या मुद्यांचा अनुषंगाने लावलेली कलम रद्द करावीत या मागणीसाठी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. राज्य सरकारच्या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती यांच्या कोर्टात सुनावणी होईल.

‘ते क्षण पुन्हा अनुभवायचे आहेत...’; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावुक

राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. आज ही सुनावणी न्यायमूर्ती शाहरूख काठावाला यांच्या खंडपीठात होती. मात्र , त्यांनी सुनावणी सुरू होताच  ही सुनावणी आता 8 जून रोजी मुख्य न्यायमूर्ती यांच्या कोर्टात चालेलं असं सांगितलं. त्यामुळे 8 जून रोजी कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीची धाड

दरम्यान,अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी नागपूरमध्ये ईडीने धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या घरी ईडीने धाड टाकली. नागपूरच्या शिवाजी नगरमधील व्यावसायिक सागर भटेवार, समित आयझॅक आणि  जाफरनगरमध्ये राहणारे जोहर कादरी या तिघांच्या घरी ईडीने धाड टाकली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्वाची कागतपत्रे ईडीच्या पथकाने जप्त केली. जोहर व समित यांच्या घरून देखील महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

 

First published:

Tags: CBI, सीबीआय