मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Lockdown मध्येही करा 'चीअर्स', दारुच्या होम डिलिव्हरीला मुंबई मनपाची परवानगी

Lockdown मध्येही करा 'चीअर्स', दारुच्या होम डिलिव्हरीला मुंबई मनपाची परवानगी

कोरोनाच्या (Coronavirus Maharashtra lockdown) पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक द चेन (break the chain) अंतर्गत तसेच वीकेंड लॉकडाऊनदरम्यान अत्यंत कडक निर्बंध लावले असताना मद्यप्रेमींसाठी BMC ने एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

मुंबई, 10 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus Maharashtra lockdown) पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक द चेन (break the chain) अंतर्गत तसेच वीकेंड लॉकडाऊनदरम्यान अत्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र असं असलं मुंबई मनपाने मद्यप्रेमींना दिलासा दिला आहे. ऑनलाईन विक्री आणि घरपोच मद्यपुरवठा करण्यास करण्यास परवानगी दिली आहे. कुणालाही थेट दुकानात जाऊन मद्य खरेदी (Can you buy alcohol during lockdown) करता येणार नाही. मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत होम डिलिव्हरी मिळू शकेल.

मुंबईसाठी लागू करण्यात आलेल्या या आदेशानुसार परवानाधारक मद्य विक्रेते हे परवानाधारक खरेदीदाराला मद्य विक्री करू शकतात. त्यासाठी घरपोच डिलिव्हरी करावी लागेल. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत या होम डीलव्हरीला परवानगी असेल. यामध्ये मद्यविक्रेत्याला भारतीय बनावटीची,किंवा विदेशी मद्य, बीअर, सॉफ्ट ड्रिंक, वाईन अशा प्रकारच्या मद्याची घरपोच डिलिव्हरी देता येईल. खरेदीदाराने दिलेल्या घरच्या पत्त्यावर हे मद्य पोहोचवावे लागेल. ज्या परिसरामध्ये संबंधित दुकान असेल त्या परिसरातील ग्राहकालाच मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यास परवानगी असेल. दुकानात जाऊन मद्याची खरेदी करण्याची परवानगी कुणालाही नसेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मद्याची डिलिव्हरी करण्यासाठी ठरवलेल्या व्यक्तीलाही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागेल. डिलिव्हरीदरम्यान मास्कचा वापर वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर किंवा हातांचे निर्जंतुकीकरण त्यांना करावे लागेल. सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत जारी केलेले आदेश लागू असेपर्यंत ही परवानगी राहील. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील पूर्वी लागू केलेले नियम लागूच राहतील.

First published:

Tags: BMC