मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईच बंद केली आणि.... कोरोनावर उपाय म्हणून पंकजा मुंडेंनी दिला सल्ला

मुंबईच बंद केली आणि.... कोरोनावर उपाय म्हणून पंकजा मुंडेंनी दिला सल्ला

आज महाराष्ट्रात पहिला बळी गेल्यामुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून अनेक शहारांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण...

आज महाराष्ट्रात पहिला बळी गेल्यामुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून अनेक शहारांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण...

आज महाराष्ट्रात पहिला बळी गेल्यामुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून अनेक शहारांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण...

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 17 मार्च : देशभरात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात आज महाराष्ट्रात पहिला बळी गेल्यामुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून अनेक शहारांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण आर्थिक राजधानी मुंबईची गर्दी थांबवण्यासाठी मुंबईच बंद करणं महत्त्वाचं असा सल्ला माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. कोरोनासारख्या आजारापासून मुंबईकरांना वाचवण्यासाठी मुंबईच बंद करणं आवश्यक असल्याचं पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. पुढील 7 दिवस मुंबई बंद करण्याचा निर्णय घेतला तर यातून अनेक मुंबईकर कोरोना व्हायरसपासून बचावतील. बंद करण्याची सुचना आधीच दिली तर त्याप्रमाणे लोक आवश्यक वस्तूंचा स्टॉक घरी आणून ठेवतील. दुकानं केवळ अति महत्त्वाच्या खरेदीसाठी उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. कुठल्याही प्रकारच्या विंडो शॉपिंगला परवानगी देऊ नये. असा काही प्रयत्न करून पाहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं पंकजांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईची लोकल बंद करणार की नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं टोपे म्हणाले. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे. कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही वेगाने प्रवेश केला. भारताची आर्थिक राजधानीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला इतरही आजर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या या पहिल्या मृत्यूनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्वरित बैठक बोलवली आहे. महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ देशात कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे भारतात मृतांची संख्याही तीन झाली आहे. आज मुंबईतही कोरोनाने पहिला बळी घेतला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते.
First published:

Tags: Corona, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या