‘लॉकडाउन’मध्ये कुत्र्यांना फिरायला घेऊन जाता येतं का? प्राणी प्रेमींचा थेट पंतप्रधानांना सवाल

‘लॉकडाउन’मध्ये कुत्र्यांना फिरायला घेऊन जाता येतं का? प्राणी प्रेमींचा थेट पंतप्रधानांना सवाल

लॉकडाउन हा 21 दिवसांचा असल्याने कुत्र्यांना बाहेर फिरविण्याची परवानगी आहे का असा सवाल प्राणी प्रेमींनी केला आहे.

  • Share this:

मुंबई 25 मार्च :  देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनमुळे सगळं चक्रच थांबलं आहे. 130 कोटींचा देश घरात बंद आहे. तर जगातले सगळे बलाढ्य देशही लॉकडाउन आहेत. कोरोनाचा संसर्ग हा माणसांमुळे झपाट्याने होत असल्याने ती साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग हाच मोठा उपाय आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे जगण्याचे सगळेच संदर्भ बदलले आहेत. माणसं एक वेळ घरी राहातील पण प्राळीव प्राण्यांचं काय करायचं असा प्रश्न आता प्राणीप्रेमी विचार असून त्यांनी थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये जागा कमी असली तरी त्यातही प्राणीप्रेमी घरात कुत्रा किंवा इतर पाळीव प्राणी ठेवत असतात. त्यांना दररोज बाहेर फिरवून आणणं हा त्यांच्या दैनंदिनीचा भाग असतो. लॉकडाउन हा 21 दिवसांचा असल्याने कुत्र्यांना बाहेर फिरविण्याची परवानगी आहे का असा सवाल प्राणी प्रेमींनी केला आहे.

तर महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेच्या यादीत प्राळीव प्राण्यांचं खाद्य असणारी दुकानेही आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोनाच्या (Covid - 19) वाढत्या पादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी काल देशभरात लॉकडाऊन (Lockdown) ची घोषणा केली. यानंतर काही काळ लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यात देशातील अनेक क्षेत्रातील कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करीत असल्याने इंटरनेटवर (Internet) अतिरिक्त भार येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक भागात पावसामुळे वीज गेल्याच्या घटना घडल्या होत्या. परिणामी काही काळ इंटरनेटही बंद झाला. त्यामुळे घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन कारावा लागला. दुसरीकडे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नागरिक मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करीत आहेत. त्याचही मोबाइल वापरकर्त्यांची संख्याच जास्त आहे. त्यामुळे इंटरनेटवर मोठा ताण येत आहे.

 

 

First published: March 25, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading