Home /News /mumbai /

जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यानं सुरू केला मुंबईचा वीजपुरवठा, VIDEO पाहून कराल सलाम

जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यानं सुरू केला मुंबईचा वीजपुरवठा, VIDEO पाहून कराल सलाम

कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून हे काम करावं लागतं. हे काम किती धोक्याचं आणि जोखमीचं असतं हे या व्हिडीओमधून आपल्याला पाहायला मिळू शकतं.

    ठाणे, 17 ऑक्टोबर : मुंबईला 24 तास वीजपुरवठा मिळतो. आपल्याला घरात, कामाच्या ठिकाणी असल्यामुळे वीज मिळत असते. ही वीज गेल्यावर मात्र आपण महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना अगदी सहज नावं ठेवतो. पण ते कर्मचारी जीव धोक्यात घालून कायम नागरिकांना 24 तास वीजपुरवठा कसा होईल याकडे लक्ष देत असतात. याचं उत्तम उदाहरण सांगणारा व्हिडीओ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वत: ट्वीट केला आहे. मुंबईला अखंड वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांपैकी एका वाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून हे काम करावं लागतं. हे काम किती धोक्याचं आणि जोखमीचं असतं हे या व्हिडीओमधून आपल्याला पाहायला मिळू शकतं. हा व्हिडीओ डॉ. नितीन राऊत यांनी ट्वीट करून कॅप्शनमध्ये या कर्मचाऱ्याला सलाम असं म्हटलं आहे. हे वाचा-VIDEO: सुसाट कारची जोरदार धडक आणि ट्रॅक्टरचे झाले तुकडे; थोडक्यात वाचला चालक डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या चार मुख्य वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा-तळेगाव या वीज वाहिनीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम आणि अतिखोल भागात वादळ आणि वा-यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्यांच्या कर्तव्याला आणि धाडसाला सलाम असंही ते पुढे म्हणाले आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जवळपास लोकलपासून ते रुग्णालयापर्यंत अनेक सेवा विस्कळीत झाल्या होत्या. ही सगळी व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत पुन्हा एकदा वादळीवार आणि पाऊस यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. मुंबईतील वीजपुरवठा कायम सुरू राहावा यासाठी तातडीनं हे काम करण्यात आलं. या कर्मचाऱ्याच्या कर्तव्याला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सलाम केला आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या