Home /News /mumbai /

BREAKING : मंत्रिमंडळाची बैठक संपली, कोणतीही राजकीय चर्चा नाही, 11 प्रस्ताव सादर

BREAKING : मंत्रिमंडळाची बैठक संपली, कोणतीही राजकीय चर्चा नाही, 11 प्रस्ताव सादर

 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

    मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. पण, या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांनीही सरकार सुरू असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकूण १३ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. तर. 'काही ही झालं नाही. मुख्यमंत्री नेहमी प्रमाणे आले आणि बैठक झाली. तुम्ही चुकीच्या बातम्या करतात. आमदार शिवसेनेचे गेले आहे. सरकार सद्या सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. विजय वडट्टेवीर यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली पण नंतर त्यांनी शब्द फिरवला. तर नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या बैठकीला प्रत्यक्षपणे हजर राहू शकले नाही.ऑनलाईनच मुख्यमंत्री हजर होते. मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित मंत्री अजित पवार हसन मुश्रीफ छगन भुजबळ दिलीप वळसे-पाटील धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण जयंत पाटील सुभाष देसाई यशोमती ठाकूर शंकरराव गडाख विजय वडेट्टीवार असलम शेख के सी पाडवी नितीन राऊत वर्षा गायकवाड दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता खाली टेकले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या