S M L

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार !

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान, परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.

Chandrakant Funde | Updated On: Sep 19, 2017 06:22 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार !

मुंबई, 19 सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान, परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 5 किंवा 6 ऑक्टोबरला राज्य सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ एकदाचा मार्गी लागू शकतो, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलीय.

पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजेच घटस्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात होतं. तशा बातम्याही भाजपच्या वर्तुळातून मध्यंतरी पेरल्या गेल्या होत्या. पण आता हा मुहूर्तही लांबणीवर पडलाय कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान परदेश दौऱ्यावर जाताहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात येण्यासाठी देव पाण्यात ठेवलेल्या इच्छुकांना पुन्हा एकदा वाट पहावी लागणार आहे. तर गच्छतीची भीती सतावणाऱ्यांना पंधरा दिवसांचा दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 06:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close