• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • bypolls election result : शिवसेना, काँग्रेसमध्ये खुशी तर राष्ट्रवादीत गम!

bypolls election result : शिवसेना, काँग्रेसमध्ये खुशी तर राष्ट्रवादीत गम!

 आजचा दिवस शिवसेना (shivsena) आणि काँग्रेससाठी (congress) खुशीचा ठरला आहे तर राष्ट्रवादीमध्ये तणावपूर्ण होता.

आजचा दिवस शिवसेना (shivsena) आणि काँग्रेससाठी (congress) खुशीचा ठरला आहे तर राष्ट्रवादीमध्ये तणावपूर्ण होता.

आजचा दिवस शिवसेना (shivsena) आणि काँग्रेससाठी (congress) खुशीचा ठरला आहे तर राष्ट्रवादीमध्ये तणावपूर्ण होता.

 • Share this:
  मुंबई, 02 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government) दोन वर्ष पूर्ण होत आहे. याच महिन्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, आजचा दिवस शिवसेना (shivsena) आणि काँग्रेससाठी (congress) खुशीचा ठरला आहे तर राष्ट्रवादीमध्ये तणावपूर्ण होता. पण, भाजपच्या पराभवावर तिन्ही पक्ष मात्र खूश होते. भाजपचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे  दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. कमलाबेन डेलकर यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढवली होती. कमलाबेन  यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली. निर्लज्ज! स्वतःला म्हणवतो Boob Hunter, महिलांशी लगट करण्याची लावायचा स्पर्धा या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे. तसेच शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीच आनंद होता. दिवाळीच्या निमित्ताने आजच शिवसैनिकांनी जोरदार फटाके वाजत एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या हा भाग शिवसेनेनं जिंकला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला. तर दुसरीकडे, पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालाची (Deglur assembly election bopolls result) मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. Night Jasmine: जाणून घ्या रातराणीचं रोप घरात का लावावं? मिळतील 5 जबरदस्त फायदे शेवटच्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर यांना 108840 मते मिळाली तर भाजपच्या सुभाष साबणे (Subhash Sabane) 66907 मते मिळाली. यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी जिंकली आहे. जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक खूप गांभीर्याने घेतली. सूक्ष्म असं नियोजन त्यांनी केलं. प्रचंड मेहनत घेतली. परिणामी काँग्रेसला विक्रमी विजय मिळाला. अनिल देशमुख यांना अटक तर राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस हा तणावपूर्ण आणि धक्कादायक होता. 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडूनही आयकर विभागाने खुलासा मागवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र लढत निवडणुकाच्या मैदानात बाजी जरी मारली असली तरी राष्ट्रवादीमध्ये चिंतातूर वातावरण आहे. त्यामुळे आजचा दिवस या तिन्ही पक्षांसाठी कुठे खुशी तर कुठे गम असाच होता.
  Published by:sachin Salve
  First published: