मुंजळा शेट्येच्या गुप्तांगावर जखमा नाहीत, शवविच्छेदनाचा अहवाल

मुंजळा शेट्येच्या गुप्तांगावर जखमा नाहीत, शवविच्छेदनाचा अहवाल

मंजुळाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये गुप्तांगावर कोणत्याही जखमा नसल्याचं उघड झालंय.

  • Share this:

29 जून : भायखळा जेलमध्ये मारहाणीत मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये प्रकरणाला आता वेगळं वळणं लागलंय. मंजुळाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये गुप्तांगावर कोणत्याही जखमा नसल्याचं उघड झालंय.

भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्ये या महिलेला ब्रेड आणि अंडीच्या हिशेबावरून जेल अधिकारी मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणेने  यांनी तिला अमानुष मारहाण केली.

तर दुसरीकडे शीना बोरा हत्याप्रकरणातील दोषी इंद्राणी मुखर्जीने मंजुळा शेट्येला विवस्त्र करून मारहाण केली आणि गुप्तांग काठ्या घातल्यात असा गंभीर आरोप इंद्राणीने केला होता. तिच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. आज जेजे रुग्णालयाने मंजुळाचा शवविच्छेदनाचा अहवाल सादर केला असून यात तिच्या गुप्तांगाला जखमा झाल्या नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे इंद्राणीने केलेला आरोप चुकीचा ठरलाय.

शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली होती. त्यामुळे आता जेल प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

दरम्यान, भायखळा जेल मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगानं स्वत:हून दखल घेतली आहे. कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक स्वाती साठेंची 40 मिनिटं चौकशी झाली. महानिरीक्षकसुद्धा या चौकशीला समोरे गेले. तसंच मारहाण प्रकरणाचा अहवालही आयोगानं मागवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 10:04 PM IST

ताज्या बातम्या