रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

रिक्षा चालकासह 4 जण रिक्षामध्ये प्रवास करत होते. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं होती. तर पतीच रिक्षा चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 05:21 PM IST

रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 20 मे : नवी मुंबईच्या उरण खारपाडा मार्गावर एनएमएमटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका 5 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

रिक्षा चालकासह 4 जण रिक्षामध्ये प्रवास करत होते. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं होती. तर पतीच रिक्षा चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भर रस्त्यात एनएमएमटी बसला रिक्षाची धडक बसल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली.

स्थानिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात नेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या रिक्षा आणि बसच्या या भीषण अपघातामध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीने आपले प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

जुईनगर - कोपरोलीची बस जात असताना समोरून रिक्षाची धडक बसली. रिक्षा उलट दिशेने आल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Loading...


VIDEO : 'मनसे फॅक्टर'चा फायदा होईल, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...