फ्री वेवर बसचा अपघात, बस चालकासह 11 विद्यार्थी गंभीर जखमी

फ्री वेवर बसचा अपघात, बस चालकासह 11 विद्यार्थी गंभीर जखमी

काल रात्री मुंबईच्या फ्री वेवर द्रुतगती महामार्गवर एका बसला अपघात झाला यात एकूण 11 जण जखमी झाले. हे जखमी टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च सेंटरचे विध्यार्थी होते.

  • Share this:

10 मे : काल रात्री मुंबईच्या फ्री वेवर द्रुतगती महामार्गवर एका बसला अपघात झाला यात एकूण 11 जण जखमी झाले. हे जखमी टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च सेंटरचे विध्यार्थी होते. जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

काल रात्री 11 वाजेच्या सुमारास हे विध्यार्थी आपला अभ्यास करून कुलाबा येथून चेंबूरच्या आपल्या होस्टेलमध्ये बसने परत येत होते. ही बस पूर्व मुक्त द्रुतगती महामार्गावर चेंबूरजवळ असलेल्या बोगद्याजवळ आली असता चालकावर नियंत्रण सुटले आणि ही बस डिव्हायडरवर आदळली.

वाहनचालकांच्या मदतीने तसेच पोलीस आल्यावर त्यांनी जखमींना गोवंडीच्या शताब्दी रुग्णलयात उपचारासाठी भरती केले. या अपघातात बस चालकाला जास्त मार लागला आहे तर इतर विध्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी चालकाविरुद्ध भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

First published: May 10, 2018, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading