राज ठाकरेंचा सावध पवित्रा, नगरसेवकांशी साधणार संवाद

राज ठाकरेंचा सावध पवित्रा, नगरसेवकांशी साधणार संवाद

राज ठाकरे दिवाळी नंतर कल्याण-डोंबिवली दौरा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्यातील केडीएमसी ही एकमेव महापालिका आहे जिथे मनसे दोन आकडी नगरसेवक आहे

  • Share this:

डोंबिवली,16 ऑक्टोबर  : मुंबईतील सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राज ठाकरे अधिक सावध झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्या इतर शहरातील नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दौरा करणार आहेत.

राज ठाकरे दिवाळी नंतर कल्याण-डोंबिवली दौरा करणार आहेत, अशी माहिती  सूत्रांनी दिली आहे.राज्यातील केडीएमसी ही एकमेव  महापालिका आहे जिथे मनसे दोन आकडी नगरसेवक आहे. केडीएमसी महापालिका मध्ये 10 नगरसेवक असून 1 स्वीकृत नगरसेवक आहे. तर पालिकेचं विरोधीपक्षनेता पद पण मनसेकडे आहे.

मुंबईत नगरसेवक फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. दिवाळी नंतर ३ दिवस राज ठाकरे कल्याण डोंबिवलीत मुक्कामाला जातील अशी माहिती आहे. मनसे नगरसेवकांशी आणि कार्यकर्त्याशी  राज ठाकरे संवाद करणार करून पक्ष बळकट करतील असे समजते आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading