S M L

'बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ', हायकोर्टात याचिका

बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असल्याचा याचिकेत मुद्दा आणि त्यात बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2017 04:44 PM IST

'बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ', हायकोर्टात  याचिका

विवेक कुलकर्णी, मुंबई

11 आॅगस्ट : बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार आहे असं म्हणत राज्य  सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

बैलगाडी शर्यतीवरील बंदी राज्य सरकारने उठवली. महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून या विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. मात्र, या राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात  अजय मराठे यांनी याचिका दाखल केली आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असल्याचा याचिकेत मुद्दा आणि त्यात बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

बैल हा धावण्याकरता नाही तर कष्टाची कामं करण्यासाठीचा प्राणी आहे असंही याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय.

मुंबई हायकोर्टाने बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारनं आव्हान दिलं नव्हतं, याचाच अर्थ राज्य सरकार बैलगाडी स्पर्धा बंदीच्या बाजूने असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

Loading...
Loading...

तसंच सुप्रीम कोर्टानेही बैलगाडी स्पर्धा हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ नसल्याचं म्हटलं होतं. याचा उल्लेखही मराठे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 04:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close