मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू दिली जाणार नाही-राज ठाकरे

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू दिली जाणार नाही-राज ठाकरे

तसंच 5 ऑक्टोबरला पश्चिम रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. या मोर्च्यात मुंबईकर आणि ठाणेकरांनी सामील व्हावे असं आव्हानही त्यांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर: मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीटही रचू दिली जाणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे तसंच 5 ऑक्टोबरला पश्चिम रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. या मोर्च्यात मुंबईकर आणि ठाणेकरांनी सामील व्हावे असं आव्हानही त्यांनी केलं आहे.

काल मुंबईत झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. कालची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. दरवर्षी रेल्वे दुर्घटनेत 10 हजार मृत्यू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.गेल्या तीन वर्षात काहीही बदललं नाही फक्त नोटेचा रंग बदलला अशी टीका केंद्र सरकारवर त्यांनी केली. आधी राज्या काँग्रेस आणि आता राज्य करणारं भाजप या दोन्ही पक्षांमध्ये काही फरक उरला नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

सुरेश प्रभू चांगल काम करत होते असंही त्यांनी सांगितलं. राम मंदिर नक्की कधी बांधणार असा सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत विचारला. तसंच रेल्वे स्थानकांची नाव बदलली म्हणून परिस्थिती बदलत नसते असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

जोपर्यंत परकीयांचे लोंढे राज्यात येणं थांबत नाही तोपर्यंत मुंबईची परिस्थिती बदलणार नाही असा पवित्रा ठाकरेंनी घेतला. तसंच या भूमिकेवर कायम राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं . मोदींना बुलेट ट्रेन आणायची असेल तर ती त्यांनी गुजरातमध्ये आणावी असंही राज ठाकरे म्हणाले.

आता 5 ऑक्टोबरला राज ठाकरे जो मोर्चा काढणार आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

 

First published: September 30, 2017, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading