Home /News /mumbai /

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला-एकाचा मृत्यू ; कल्याणमध्ये घरात घुसले खाडीचे पाणी

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला-एकाचा मृत्यू ; कल्याणमध्ये घरात घुसले खाडीचे पाणी

उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प मधील मुरलीवाला कॉम्प्लेक्सचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली. तर मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात खाडीचे पाणी शिरले आहे.

    मुंबई, ता. 15 जुलै : उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प मधील मुरलीवाला कॉम्प्लेक्सचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली. या घटनेत लीना गंगवाणी  या महिलेचा मृत्यू झालाय. जर्जर झालेल्या या इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून ऐरणीवर आला होता. त्यातच आता मुसळधार पावसामुळे इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात खाडीचे पाणी शिरले आहे. तुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्या 50 पर्यटकांची अशी झाली सुटका जागतिक वारसा लाभलेल्या मरीन ड्राईव्हची पावसाने झाली कचरापट्टी कल्याणमध्ये घुसले खाडीचे पाणी मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातील नागरीकांच्या घरात खाडीचे पाणी शिरले आहे. याठिकाणी राहणाऱ्या अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोणतिही अप्रिय घटना घडू नये म्हणून कल्याणमधील खाडीलगतच्या वसत्यांमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी न्युज18 लोकमतला दिली. मुंबईला उद्या दूधपुरवठा नाही? पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स खडकवासला भरले, उद्या पाणी सोडणार!    
    First published:

    Tags: Building, Govindvadi, Kalyan, Murliwala complex, One death, Sea water, Slab collapses, Ulhasnagar, उल्हासनगर, कल्याण, खाडीचे पाणी शिरले, गोविंदवाडी, मुरलीवाला कॉम्प्लेक्स, स्लॅब कोसळला

    पुढील बातम्या