मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळ इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखालून 17 जणांना काढलं

दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या लोहार चाळ येथे युसूफ नावाची इमारत आहे. ही इमारत चार मजली आहे. इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास अचानक कोसळला.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 10:47 AM IST

मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळ इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखालून 17 जणांना काढलं

मुंबई, 11 सप्टेंबर: मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळ असलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 17 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading...

मिळालेली माहिती अशी की, दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या लोहार चाळ येथे युसूफ नावाची इमारत आहे. ही इमारत चार मजली आहे. इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकलेले होते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले आहे. इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे जवानांना यश आले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत मशिद बंदर परिसरात एका इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. 95 नागादेवी क्रॉस लेनवरील सैय्यद इमारतीचा काही भाग कोसळून ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. ही इमारत निष्कासीत केली जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, या इमारतीत 3 ऑगस्टला आग लागली होती. जी 5 तारखेपर्यंत धुमसत होती.

सैय्यद इमारतीला 3 ऑगस्टला सकाळी भीषण आग लागली होती. आग एवढी भीषण होती की, परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम केल्यानंतरही आग 5 तारखेपर्यंत धुमसत होती. हीच इमारत निष्कासीत केली जात असताना ही दुर्घटना घडली.

डोंगरीत इमारत कोसळून झाला होता 10 जणांचा मृत्यू

डोंगरी परिसरात 16 जुलैला एक चार मजली 'केसरबाई' इमारत कोसळली होता. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. म्हाडाची ही इमारत 80 वर्षे जुनी होती. ती धोकादायक बनली होती. इमारतीमध्ये 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली 50 जण अडकली होती. अब्दुल हमीद दर्ग्याच्या शेजारी असलेली केसरबाई इमारत सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि NDRF पथकाकडून मदत आणि बचाव कार्य करण्यात आले होते.

मराठी सेलिब्रिटींनी केला बदलाचा श्रीगणेशा, पाहा हा VIDEO

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-406253" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDA2MjUz/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2019 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...